सौर कृषिपंप वाटायचेत १९०० अन् अर्ज आले लाखावर
सौर कृषिपंप वाटायचेत १९०० अन् अर्ज आले लाखावर...! बीड : पंतप्रधान सौर कुसुम योजनेंतर्गत कृषिपंपासाठी ९५ टक्के अनुदान मिळणार असल्याने शेतकऱ्यांची अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडाली होती. दि. १७ मे ते २६ जून २०२३ या कालावधीत बीड येथील महाऊर्जा कार्यालयाला ऑनलाइन पद्धतीने जिल्ह्यातील १ लाख ८ हजार ७४८ अर्ज प्राप्त झाले आहेत. यातील विशेष बाब म्हणजे सौरपंप वाटपाचे उद्दिष्ट १,९०० आहे अन् लाखावर अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे अर्ज भरलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला कृषिपंप मिळण्यासाठी एक ते दोन वर्षांपेक्षा जा वाट पाहावी लागणार असल्याचे समजते. दरम्यान, सौर कुसुम योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख जाहीर झालेली नसल्याने शेतकरी अद्यापही अर्ज भरतच आहेत. राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री किसान उर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियानाला (पीएम-कुसुम) राज्यात गती देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. त्यानुसार या योजनेच्या चौथ्या टप्प्यासाठी अर्ज मागविण्यात आले. शेतकयांनी मोठ्या धडपडीने रात्रभर जागून, इंटरनेट कॅफे, सीएमएस सेंटरचालकांच्या संपर्कात राहून अर्ज भरले; मात्र उद्दिष्ट कमी असल्यान...