सौर कृषिपंप वाटायचेत १९०० अन् अर्ज आले लाखावर

सौर कृषिपंप वाटायचेत १९०० अन् अर्ज आले लाखावर...! 


 बीड : पंतप्रधान सौर कुसुम योजनेंतर्गत कृषिपंपासाठी ९५ टक्के अनुदान मिळणार असल्याने शेतकऱ्यांची अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडाली होती. दि. १७ मे ते २६ जून २०२३ या कालावधीत बीड येथील महाऊर्जा कार्यालयाला ऑनलाइन पद्धतीने जिल्ह्यातील १ लाख ८ हजार ७४८ अर्ज प्राप्त झाले आहेत. यातील विशेष बाब म्हणजे सौरपंप वाटपाचे उद्दिष्ट १,९०० आहे अन् लाखावर अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे अर्ज भरलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला कृषिपंप मिळण्यासाठी एक ते दोन वर्षांपेक्षा जा वाट पाहावी लागणार असल्याचे समजते.


दरम्यान, सौर कुसुम योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख जाहीर झालेली नसल्याने शेतकरी अद्यापही अर्ज भरतच आहेत.


राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री किसान उर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियानाला (पीएम-कुसुम) राज्यात गती देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. त्यानुसार या योजनेच्या चौथ्या टप्प्यासाठी अर्ज मागविण्यात आले. शेतकयांनी मोठ्या धडपडीने रात्रभर जागून, इंटरनेट कॅफे, सीएमएस सेंटरचालकांच्या संपर्कात राहून अर्ज भरले; मात्र उद्दिष्ट कमी असल्याने अर्ज भरलेल्या प्रत्येकाला सौर कृषिपंप मिळेलच, हे सांगता येणार नाही.


अर्ज करणाऱ्या


शेतकऱ्यांची आकडेवारी


आष्टी


९१४७


५०२९


६०६८


पाटोदा .


शिरूर


गेवराई


४५०३२


माजलगाव


वडवणी


१४९३७ ६६९३


बीड


१७२६४


केज


१३९९६


धारूर


६१४१


५३०४


परळी


अंबाजोगाई


५६४२


पंतप्रधान सौर कुसुम योजनेचा चौथा टप्पा


पंतप्रधान सौर कुसुम योजनेंतर्गत कृषिपंप योजनेला २०२१ पासून सुरुवात झाली होती. पहिल्या टप्प्यात १०९ पैकी १०४ शेतकऱ्यांना सौर कृषिपंप देण्यात आले. दुसया टप्प्यात २,४३४ अर्ज प्राप्त झाले, त्यापैकी २,३१३ शेतकऱ्यांना कृषिपंप दिला गेला. तिसऱ्या टप्प्यात २,२९९ अर्ज प्राप्त झाले, त्यापैकी


१.४२१ शेतकऱ्यांना लाभ दिला गेला आहे. तिसऱ्या टप्प्यातील ७०९ कृषिपंपांचे इन्स्टॉलेशन प्रलंबित आहे तर चौथा टप्पा सध्या सुरू आहे. चौथ्या टप्प्यात ऑनलाइन पद्धतीने १७ मे ते २६ जून या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने १ लाख ८ हजार ७४८ अर्ज प्राप्त झाले आहेत व उद्दिष्ट केवळ १.९०० आहे.


.....अशी असेल प्रक्रिया


कृषिपंपासाठी अर्ज केलेल्या लाभार्थीची यादी तयार झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या मोबाइलवर मेसेज व पैसे भरण्यासाठी पेमेंट ऑप्शन दिला जातो. कृषिपंपाच्या एकूण किमतीच्या १० टक्के रक्कम संबंधित शेतकऱ्याकडून भरणा करून घेतली जाते. त्यानंतर शेतकयाच्या शेतात जाऊन लाइनमन सर्व्हे करतात. तसेच महाऊर्जा कार्यालयाचे अधिकारी, कृषिपंप बसविणारे अधिकारी व लाइनमन यांचाही संयुक्त सर्व्हे होतो. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्याच्या शेतात कृषिपंप बसविला जातो.


पंतप्रधान सौर कुसुम कृषिपंप योजनेंतर्गत फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह' अर्थात प्रथम येणाऱ्यााला प्रथम प्राधान्य यानुसार लाभ देण्यात येत आहे. तिसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांना कृषिपंप बसवून दिले जात आहेत. त्यामुळे चौथ्या टप्प्यातील अर्ज करणाऱ्या शेतकरी लाभार्थीना कधी कृषिपंप द्यायचे, हा निर्णय वरिष्ठस्तरावरून घेतला जाईल, प्रत्येक वर्षाला १ लाख कृषिपंप वाटपाचे राज्याला उद्दिष्ट आहे. त्यामुळे राज्यात ज्या जिल्ह्यात जास्त अर्ज असतील, त्या

ठिकाणी अधिक कृषिपंप दिले जाण्याची शक्यता आहे. सुमेध गांधेले. प्रकल्प कार्यकारी अधिकारी, मेढा, बीड.


धन्यवाद..! 

Comments

Popular posts from this blog

𝙒𝙚𝙖𝙩𝙝𝙚𝙧 𝙐𝙥𝙙𝙖𝙩𝙚| 23-24 जूनला मराठवाड्यातील या जिल्ह्यामध्ये होणार मुसळधार पावसाच्या आगमन

10 वी किंवा 12 बारावी झालेल्या विद्यार्थ्यांना आता पंधरा हजार रुपये मिळणार

1th मुलगी असेल तर आता पन्नास हजार रुपये मिळणार तात्काळ अर्ज करा