कांदा अनुदान निधी प्राप्त या तारखेला भेटणार राज्यातील शेतकऱ्यांना अनुदान.
कांदा अनुदान निधी प्राप्त या तारखेला भेटणार राज्यातील शेतकऱ्यांना अनुदान..!
कांदा अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कांद्याचे भाव कमी झाल्याने राज्य सरकारने प्रतिक्विंटल 350 रुपये कांदा अनुदान जाहीर केले होते. या अनुदानाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अखेर राज्य शासनाकडून आनंदाची बातमी देण्यात आली आहे.
सुरुवातीला जूनमध्ये हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यावेळी निधीची कमतरता होती, त्यामुळे अनुदानाचे वितरण पावसाळी अधिवेशनापर्यंत लांबले होते. पावसाळी अधिवेशनात कांदा अनुदानासाठी निधीची मागणी करण्यात आली होती.
निधीची मागणी करण्यात आल्यानंतर त्याला वित्त विभागाने मंजुरी दिली होती. सहकार विभागाने मंजूर खर्चाचे विवरणपत्र सादर केले असून त्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी 550 कोटींची तरतूद आहे. हा निधी लवकरच शासन निर्णयाद्वारे (GR) जारी केला जाईल.
शेतकऱ्यांना त्यांच्या जिल्हा आणि बाजार समितीवर आधारित वितरित केला जाईल. नेमके किती शेतकऱ्यांना कांदा अनुदान मिळणार आहे, याचीही माहिती दिली जाईल. 10 ऑगस्टपर्यंत निधी आणि अनुदानाचे वितरण पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.

Comments
Post a Comment