शेतकरी सन्मान योजनेत महाराष्ट्रात गडबड🔊👇✅
१३ लाखांहून अधिक अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यात १५०० कोटी; करदात्यांच्या खात्यातही रक्कममुंबई :
राजन शेलार देशातील पात्र शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेंतर्गत दरवर्षाला ६ हजार रुपयांची मदत केली जाते. महाराष्ट्रात या संदर्भात धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पात्र नसलेल्या १३ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी हा लाभ मिळवला असून त्यांच्या खात्यात सुमारे १५०० कोटी रुपये जमा झाले आहेत.
विशेष म्हणजे अपात्र धारकांमध्ये विविध क्षेत्रातील करदात्यांचाही समावेश आहे. ही रक्कम वसूल करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने हालचाली सुरू केल्या असून आतापर्यंत केवळ १०० कोटी रुपये वसूल करण्यात प्रशासनाला यश आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी २०१९ मध्ये पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत दरवर्षाला चार महिन्याच्या अंतराने तीन हप्त्यांमध्ये २ हजार रुपये थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी
• केंद्राने सन्मान योजनेंतर्गत कडक भूमिका घेत लाभार्थी शेतकऱ्यांकडून भूमी अभिलेख खात्यात जमिनीची अद्ययावत नोंद करणे, ई-केवायसी करणे, बँक खात्याला आधार जोडणे आदी कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आदेश दिले.
● ४ लाख जणांनी जमीन नोंदणीची कागदपत्रे दिलेली नसून १९ लाख जणांनी ई-केवायसी केलेली नाही. १३ लाखांचे आधार लिंक नाही.
● ज्यांनी कागदपत्रांची पूर्तता केली आहे असे ८१ लाख शेतकरी लाभार्थी ठरले आहेत. या पात्र शेतकऱ्यांना आतापर्यंत १३ हप्ते देण्यात आले असून १४ वा हप्ताही लवकरच देण्यात येणार असल्याची माहिती कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली.
महाराष्ट्रातून सुमारे १ कोटी १५ लाख ९६ हजार ७७२ शेतकन्यांनी नोंदणी केली होती.
यामध्ये अहमदनगर (७ लाख ९ हजार ५०७), बीड (५ लाख २७ हजार ५६१),
अपात्रांमध्ये ४ लाख आयकर भरणारे
• पंतप्रधान शेतकरी सन्मान
योजनेचा लाभ कोणाला मिळणार याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे, असे असतानाही यामध्ये कर भरणाऱ्या शेतकऱ्यांबरोबरच विविध क्षेत्रांत कार्यरत असणारे करदातेही लाभार्थी ठरले होते. यामध्ये ४ लाख आयकर भरणाऱ्यांचा समावेश असून ८ लाख ७४ हजार जण इतर कारणास्तव अपात्र ठरले आहेत.
केवळ १०० कोटींची वसुली करण्यात यश
2
बुलढाणा (४ लाख १३ हजार ११४), जळगाव (५ लाख १४ हजार २९७) कोल्हापूर (५ लाख ६० हजार ५९१ ), नांदेड (५ लाख २२ हजार), नाशिक (४ लाख ९४
हजार ४९१), पुणे (५ लाख ३७ हजार ९६१), सांगली (४ लाख ६७ हजार ३३४), सातारा (५ लाख ७४ हजार ८८४), सोलापूर (६ लाख ६४ हजार ६२५) या जिल्ह्यांतील
Comments
Post a Comment