कर्जाच्या अॅप्सवर फसवणुकीचे वाढते प्रकार चिंताजनक😮🔊
राज्यात अनेकदा सेक्सटॉर्शन किंवा कर्जाच्या अँपमध्ये फसलेले लोक तक्रार करीत नाहीत. लोकापवाद म्हणजे समाजात होणारी बदनामी हा काल्पनिक राक्षस हीच या ब्लॅकमेल करणाऱ्या सगळ्या गुन्हेगारांची मोठी ताकद असते. सेक्सटॉर्शन हा शब्द अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यात १९५० मध्ये पहिल्यांदा वापरला होता. तेव्हा तो पुढील काही दशकांमध्ये विश्वव्यापी होईल याची कल्पना कुणी केली नव्हती. सेक्स आणि एक्सटोर्शन म्हणजे खंडणीखोरी यांचे जहरी मिश्रण म्हणजे सेक्सटॉर्शन, समाजमाध्यमांचा, नव्या तंत्रसाधनांचा आणि संवादाच्या नवनव्या फलटांचा जसजसा विस्तार होतो आहे तसतसे हे लैंगिक ई- छळाचे प्रमाण वाढत चालले आहे. अशा लैंगिक छळांसोबतच आर्थिक एक्सटॉर्शन म्हणजे खंडणीखोरीनेही समाजाला ग्रासले आहे. नव्या आधुनिक युगाचे हे दोन शाप दूर करायचे असतील तर सर्व तपासयंत्रणा, समाजातील तंत्रकुशल तरुण आणि ई-साक्षर समाज या सर्वांना एकत्र लढा देण्याची गरज आहे. नाहीतर गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यात दोन दिवसांच्या फरकाने दोन तरुणांचा प्राण गेला गेला होता. तसेच राज्यातील काही महिन्यांमध्ये अँपद्वारे कर्ज घेतल्यानंतर झालेल्या छळामुळे ज्या आत्महत्या झाल्या. त्यांचे प्रमाण भविष्यात वाढू शकेल.
आधुनिक साधने किंवा तंत्रज्ञानाचा आधार घेऊन गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना आधी शोधून काढणे, त्यांच्यावर खटले भरणे आणि त्यांना शिक्षा होणे ही अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. त्यातच आपली पोलीस यंत्रणा अजूनही पूर्णतः तंत्रसक्षम झालेली नाही. तेव्हा अगदी शाळा-कॉलेजपासून सगळ्याच शैक्षणिक संस्था तसेच सामाजिक संघटनांनी तातडीने हा गंभीर विषय हाताळण्याची आवश्यकता आहे. राजकीय पक्षांकडे मोठ्या संघटना असल्या तरी त्यांना या विषयाचे गांभीर्य कळण्याची शक्यता कमीच आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा विशिष्ट फॉर्मुला ठरलेला असतो. आधी संवादात गुंतवायचे, असे ई-संवाद वाढवायचे आणि जाळ्यात फसवून काही ना काही बोलायला, वागायला भाग पाडायचे आणि नंतर त्याचाच बागुलबुवा करून पैसे उकळायचे अशी ती पद्धत असते. सध्या कर्जे देणाऱ्या अँप्समध्येही पैसे उकळायचे हाच एकमेव मुख्य हेतू असतो. आपल्याला फार सहजपणे कर्ज मिळत आहे असा गैरसमज या अप्सचा सुळसुळाट झाल्याने झाला आहे. प्रत्यक्षात ती आधुनिक रूप ल्यायलेली पठाणी सावकारीच
आहे. मुळात कर्ज देतानाच भक्कम व्याज कापून घ्यायचे आणि नंतर लगेच भांडवलासाठी तगादा लावायचा
गुंड पाठवायचे, धमक्या द्यायच्या अशी ही रीत असते.
आज हजारो लोक अशा कर्जाच्या सापळ्यात अडकत आहेत. त्यांना वाचविणे एक मोठे आव्हानच आहे. राज्यातील पुण्यात धनकवडी आणि नंतर दत्तवाडी या भागांमध्ये काही दिवसांच्या अंतराने दोन तरुणांनी आत्महत्या केली. या दोन्ही प्रकरणांत काही दिवसांच्या
ओळखीनंतर पलीकडील व्यक्तींनी जाळ्यात ओढायचे प्राथमिक घडा सगळ्या समाजाने घेण्याची गरज आहे. आणि नंतर फोटो किंवा व्हिडीओ व्हायरल करण्याकिंवा ची धमकी द्यायची व त्याच्या बदल्यात पैसे उकळायचे हीच पद्धत आजपर्यंत अवलंबली गेली. आपली सार्वजनिक बदनामी होईल ही भीती एकदा तरुणांच्या मनात बसली की खंडणी उकळणे सोपे जाते. या खंडणीसाठी पैसे गोळा करण्याच्या नादातही अनेक तरुणांच्या हातून गुन्हे देखील घडू शकतात. अनेकदा या आत्महत्याही होतात. अशा जाळ्यात नागपूर. आपण फसलो असलो तरी आपले नातलग, मित्र आणि समाज आपल्याला समजावून घेईल, आपली बदनामी करणार नाही असा विश्वास या तरुणांच्या मनात निर्माण करायला पाहिजे. आणि त्यांचे फोनवरचे वर्तन नैतिकदृष्ट्या चूक असेलही पण त्याची शिक्षा लाखो रुपयांची खंडणी किंवा मृत्यू हे होऊ शकत नाही. अशा जाळ्यात फसलेल्या अनेक तरुणी किंवा तरुण पोलिसांकडे जातानाही. विश्वासाची भावना निर्माण झाली तरच हे प्रमाण वाढ शकेल. एकही अनोळखी व्यक्तीशी ऑडिओ किंवा व्हिडीओ कॉलवर संपर्क करायचा नाही हा अगदी
लोकापवाद म्हणजे समाजात होणारी बदनामी हा काल्पनिक राक्षस हीच या ब्लॅकमेल करणाऱ्या सगळ्या गुन्हेगारांची मोठी ताकद असते. अपवरून घेतलेली कर्ज न फेडल्यास मारहाण करणे, दमदाटी करणे हे प्रकार होतात. तसेच बदनामी देखील केली जाते. थकबाकी वसूल करण्यासाठी कधी बँक, स्थानिक स्वराज्य संस्था कधी कधी घरासमोर बँड वाजवतात. या अँपवरून आणि कर्जदारांच्या अंगावर हात टाकतात. रिझर्व्ह बँकेने काही महिन्यांपूर्वी कर्जे देऊ करणाऱ्या अशा सहाशे अँप्सवर बंदी घातली होती. यावरून हा चोरधंदा किती बळावला असेल याची कल्पना येते. गुगलनेही अशा काही अप्सवर बंदी घातली होती. मात्र हे पुरेसे ठरणार नाही. कारण अशा अँप्सवर किंवा सेक्सटॉर्शनचे प्रकार यांना कठोरपणे अंकुश घालणे हेही कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम आहे. आधुनिक तंत्रज्ञानाला गुलाम करून होणारे अशा स्वरूपाचे गुन्हे वाढतच जाणार आहेत. यासाठी समाजशिक्षण हा एकमेव पर्याय आहे.

Comments
Post a Comment