२००० ची नोट बदलण्यासाठी भरावा लागणार फॉर्म💸🔰

 🔰नोट बदलाबाबतचे नियम आले : काळ्या पैशांना आळा                    घालण्याचा दावा




दि. २१ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदीची घोषणा केली होती. त्यानंतर शुक्रवारी दोन हजाराच्या नोटबंदीचा निर्णय जाहीर झाला. रिझबैंक आता ३० सप्टेंबरपर्यंत दोन हजाराच्या नोटा चलनातून परत घेणार आहे. ३० एप्रित २०२३ पर्यंत ३.६२ लाख कोटी दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आहेत. 


आता या नोटा बँकांमध्ये जमा करता येणार आहे. परंतु त्या बँकेत जाऊन इतर नोटांप्रमाणे जमा केल्या जाणार नाही. त्यासाठी एक विशिष्ट प्रक्रिया तयार केली आहे. एक फॉर्म तयार केला असून तो भरावा लागणार आहे.


दोन हजाराच्या नोटा २३ मे पासून बँकांमध्ये बदलण्यास सुरुवात होणार आहे. त्यासाठी दोन दिवस राहिले आहेत. यामुळे बँकांनी तयारी सुरू केली आहे. बँकामध्ये २००० रुपयाच्या नोटा जमा करण्यासाठी फक्त बँकिंग नियमांचे पालन करावे लागेल, असे केंद्रीय बँकने म्हटले आहे.


 आरबीआयच्या म्हणण्यानुसार बँकेच्या शाखेतून २००० रुपयांची नोट बदलून घेण्यासाठी एक फॉर्म भरावा लागेल. या फॉर्मचे स्वरूप आरबीआयने जारी केले आहे. विशेष म्हणजे केवळ २००० च्या नोटा बदलण्यासाठी लोकांना फॉर्म भरावा लागणार आहे. काळ्या पैशाला आळा घालणे हा वा पाऊलाचा उद्देश आहे.नोट बदलण्याची मर्यादा


२३ मे २०२३ ते ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत २००० रुपयाच्या नोट बदलता येणार आहे. कोणताही व्यक्ती कोणत्याही बँकेत जाऊन या नोटा बदलून घेऊ शकतो. एका वेळेस फक्त २०,००० रुपये बदलता येणार आहे. यासाठी कोणतेही शुल्क लागणार नानमूद करावयाच्या नोटांची संख्या


याशिवाय तुम्हाला २००० रुपयांच्या किती नोटा बदलून घ्यायच्या आहेत आणि त्यांची किंमत किती आहे हे देखील फॉर्ममध्ये नमूद करावे लागेल, हा फॉर्म बँकाच्या सर्व शास्त्रामध्ये उपलब्ध असणार आहे. हा फार्म भरल्यानंतरच कोणालाही २००० रुपयांच्या नोटा बदता येणार आहे.


एसबीआय म्हणते फॉर्म भरण्याची गरज नाही


स्टेट बैंक ऑफ इंडियाच्या गाईडलाईन्सनुसार, २००० रुपयाच्या नोटा एकावेळी २० हजार रुपयांच्या मर्यादिपर्यंत बदलण्याची सुविधा असेल, यासाठी कोणताही फार्म किया स्लिप भरण्याची गरज नाही यामुळे नागरिक एकाच वेळी २००० रुपयाच्या १० नोटा बदलून घेऊ शकतात


2000


खात्यात पैसे भरल्यास फॉर्म भरण्याची गरज नाही


जर एखादी व्यक्ती त्याच्या खात्यात २००० धी नोट जमा करत असेल तर त्याला फॉर्म भरण्याची गरज नाही. फार्ममध्ये तुम्हाला तुमचे नाव, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, मनरेगा कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतीही एक ओळखपत्र पुरावा म्हणून दाखवावा लागणार आहे.


 जर समजा तुम्ही ओळख म्हणून आधार कार्ड देत असाल तर तुम्हाला त्याचा नंबर फॉर्ममध्ये लिहावा लागेल. असेच इतर कागदपत्रे दिल्यास त्याचा क्रमांक फॉर्मवर लिहिणे आवश्यक आहे.

Comments

Popular posts from this blog

𝙒𝙚𝙖𝙩𝙝𝙚𝙧 𝙐𝙥𝙙𝙖𝙩𝙚| 23-24 जूनला मराठवाड्यातील या जिल्ह्यामध्ये होणार मुसळधार पावसाच्या आगमन

10 वी किंवा 12 बारावी झालेल्या विद्यार्थ्यांना आता पंधरा हजार रुपये मिळणार

1th मुलगी असेल तर आता पन्नास हजार रुपये मिळणार तात्काळ अर्ज करा