ठरल्याप्रमाणे दोन हजाराच्या नोटांची बोळवण💸💵🔊
🔰 सर्व सामान्यांना ३० सप्टेंबरपर्यंत बँकांमधून नोटा बदलून घेता येणार.
रिझव्ह बैंक २००० च्या नोटा चलनातून मागे घेणार आहे, परंतु सध्याच्या नोटा अवैध होणार नाहीत. नोव्हेंबर २०१६ मध्ये २ हजारांची नोट बाजारात आली होती. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या नोटा बंद केल्या होत्या. त्याच्या जागी नवीन पॅटर्नमध्ये ५०० आणि २००० च्या नव्या नोटा जारी करण्यात आल्या होत्या. आरबीआयने २०१९ पासून २००० च्या नोटांची छपाई बंद केली आहे. आरबीआयने बँकांनाया नोटा ३० सप्टेंबरपर्यंत बदलत राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
एका वेळी केवळ २०,००० रुपये मूल्याच्या नोटाच बदलता येतील, तर बँका आतापासूनच २००० च्या नोटा ग्राहकांना देणार नाही. रिझर्व्ह बँक २००० च्या नोटा चलनातून मागे घेईल, परंतु सध्याच्या नोटा अवैध होणार नाहीत. आरबीआयने म्हटले की २०१८-१९ मध्ये त्यांचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर त्यांची छपाई थांबवण्यात आली होती. आरबीआयने आपल्या परिपत्रकात २००० च्या नोटा चलनातून मागे घेतअसल्याचे लिहिले आहे. यासाठी कोणतीही तारीख किंवा वेळ दिलेली नाही. म्हणजेच हा निर्णय तत्काळ लागू झाला आहे.
त्यानुसार बँकेत जाऊन या नोटा बदलता येतील. त्यासाठी ३० सप्टेंबर २०२० पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. नोटा बदलताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी बँकांनाही याबाबत कळवण्यात आले आहे. सरकारने त्या नोटा चलनात ठेवल्या असल्या तरी व्यापारी त्याद्वारे व्यवहार करण्यास कचरतील. अशा स्थितीत त्या बँकेतूनच बदलून घेणे योग्य ठरेल.
पुन्हा सामान्यांना सहन करावा लागणार २ हजारांची नोट असेल त्यांनी बँकेत जाऊन बदलून घ्यावी लागेल. २०१६ मध्ये नोटाबंदीमध्ये ५०० आणि १००० च्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या. बदलण्यासाठी वेळही देण्यात आला होता, मात्र लांबच लांब रांगा लागल्याने लोकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. यावेळीही असे चित्र दिसू शकते.

Comments
Post a Comment