कापसाला ६० हजार, सोयाबीनला५४ हजार रुपये पीककर्ज मिळणार🌱☑☑🔊
बीड : चालू वर्षात शेतकऱ्यांना कापूस पिकासाठी हेक्टरी ६०, तर सोयाबीनसाठी हेक्टरी ५४ हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा काही पिके व फळपिकांच्या कर्ज मर्यादेत वाढ झाली असून, पात्र शेतकऱ्यांनी गरजेनुसार पतपुरवठ्यासाठी संबंधित क्षेत्रातील बँकांशी संपर्क साधणे आवश्यक आहे.
खरीप व रब्बी हंगाम २०२३-२४ साठीचे अल्पमुदती खेळते भांडवल, कर्जवाटपाचे पीकनिहाय कर्जदर, रेशीम शेती उद्योग व मधुमक्षिका पालन तसेच पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसायासाठी शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणाऱ्या पीककर्ज दराची निश्चिती जिल्हा तांत्रिक सल्लागार समितीने केली आहे. नाबार्डच्या सूचनेनुसार जिल्हा तांत्रिक सल्लागार समितीने पीकनिहाय प्रतिहेक्टरी पीककर्ज व पशुसंवर्धन तसेच मत्स्य व्यवसायासाठी खेळते भांडवल कर्जमर्यादा ठरविली आहे. राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीने २०२३-२४ साठी पीक कर्जदर (स्केल ऑफ फायनान्स) निश्चित केले. नंतर जिल्हा समितीने कर्जदर जाहीर केले आहेत.तुरीला ४१ हजार, तर उडीद, मुगाला २२ हजार
तुरीसाठी हेक्टरी ४१ हजार, तर उडीद व मुगासाठी हेक्टरी २२ हजार रुपयांपर्यंत कर्ज दर निश्चित आहे. खरीप भुईमुगासाठी हेक्टरी ४३ हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकणार आहे, तर उन्हाळी भुईमुगासाठी हेक्टरी ५० हजारापर्यंत कर्ज मिळू शकेल.
सूर्यफुलासाठी हेक्टरी २७ हजार रुपयांपर्यंत कर्जमर्यादा आहे.
रब्बी पिकांसाठी कर्जपातळी
रब्बी पिकांमध्ये ज्वारी बागायतसाठी हेक्टरी ३९ हजार रुपयांपर्यंत तर ज्यारी जिरायत सुधारित संकरितसाठी ३६ हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकेल तर हरभन्यासाठी हेक्टरी ४० हजार रुपयांपर्यंत कर्जमर्यादा आहे. करडईसाठी हेक्टरी ३५ हजार रुपयांपर्यंत मर्यादा आहे. रब्बी सूर्यफुलासाठी हेक्टरी ३२ हजारापर्यंत कर्ज मिळणार आहे.
कपाशीत दोन हजाराची वाढ, सोयाबीनला तेवढेच
■ जिल्हा समितीने निश्चित केल्यानुसार सुधारित कापूस पिकासाठी प्रतिहेक्टरी ६० हजार रुपये कर्ज दर निश्चित केला आहे. मागील वर्षी कपाशीचा दर ५८ हजार रुपये होता.
सोयाबीनसाठी प्रतिहेक्टरी ५४ हजार रुपये कर्जदर मागील वर्षांप्रमाणेच कायम राहणार आहे.
बटाट्यासाठी ८३, तर कांद्यासाठी ७५ हजार
बटाटा पिकासाठी हेक्टरी ८३ हजार, तर कांदा पिकासाठी हेक्टरी ७५ हजार रुपये कर्जमर्यादा असणार आहे. गतवर्षी कांदा पिकाला हेक्टरी ७० हजार रुपये कर्जदर होता. कांदा पिकाचा दर दोन्ही हंगामासाठी सारखाच आहे.
ऊसपत कर्ज असे राहील (रुपये)
१,४४,०००
१,४०,०००
8,80,000
१,५५,००० 4
पूर्वहंगामी
મિ
खोडवा
आडसाली
Comments
Post a Comment