जून पहिला आठवडा, दहावी निकालाचा🔊🔊
मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने सीबीएसई दहावी आणि बारावीचा निकाल एकाच दिवशी जाहीर केल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी- बारावीच्या परीक्षांच्या निकालाची उत्सुकता निर्माण झाली आहे. बारावीचा निकाल ३१ मेपूर्वी, तर दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे. राज्य मंडळाची दहावीची परीक्षा २ ते २५ मार्चदरम्यान, बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत झाली.
बारावीची परीक्षा सुमारे १४ लाख विद्यार्थ्यांनी, तर दहावीची परीक्षा सुमारे १६ लाख विद्यार्थ्यांनी दिली. विविध प्रलंबित मागण्यांसाठी यंदा राज्यातील शिक्षकांनी बारावी
स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (आयसीएसई) या केंद्रीय मंडळाच्या दहावी आणि बारावीचा निकाल रविवारी जाहीर करण्यात येणार आहे. रविवारी दुपारी तीन वाजता मंडळाच्या cisce.org आणि results.cisce.org या संकेतस्थळावर हा निकाल बघता येईल.
परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला होता. त्यानंतर जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी झालेल्या संपामुळे काही दिवसशैक्षणिक कामे होऊ शकली नाहीत मात्र त्याचा परिणाम उत्तरपत्रिक तपासणीवर झालेला नसल्याचदिसून आले.आयसीएसईचा दहावी, बारावीचा आज निकालआयसीएसई या मंडळाच्या दहावी- बारावीच्या परीक्षेचा निकाल १३ मे रोजी जाहीर केला जाण्याची शक्यता होती, त्यासाठी मंडळाकडून संकेत देण्यात आले होते. त्यामुळे दुपारपर्यंत कोणत्याही क्षणी निकाल जाहीर होईल, अशी शक्यता वर्तवली ■ कौन्सिल फॉर द इंडियन जात होती. त्यामुळे विद्यार्थी या निकालाकडे लक्ष देऊन होते. मात्र, दुपारी मंडळाकडून अधिकृतरित्या हा निकाल १४ मे रोजी दुपारी जाहीर केला जाणार असल्याचे जाहीर केले.
Comments
Post a Comment