इस्कॉनतर्फे राधा गोविंद मंदिरात बालसंस्कार शिबिर

बीड: येथील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाच्या श्री श्री राधा गोविंद मंदिरात ८ ते ११ मे या कालावधीत उन्हाळी बालसंस्कार शिबिर उत्साहात पार पडले. लहान वयामध्ये मुलांना वाईट गोष्टींपासून परावृत्त करण्यासाठी व त्यांच्या जीवनामध्ये आध्यात्मिक गोडी निर्माण करण्यासाठी श्री श्री राधा गोविंद मंदिरामध्ये चार दिवसीय बालसंस्कार शिबिर झाले.

शिबिर अंतर्गत मुलांना श्लोक पठण, कथा, बुद्धीला चालना देणारे खेळ, आध्यात्मिक प्रश्नमंजूषा, फायरलेस कुकिंगमध्ये मुलांना ज्युस, ओली भेळ कशी बनवायची ते शिकवले. हे शिबिर ४ दिवस श्री राधा

गोविंद मंदिरात पार पडले. यात अनंत गोविंद यांनी मुलांना स्वच्छतेचे महत्त्व, चांगल्या सवयी व चांगल्या संगतीचे महत्त्व पटवून दिले.

शेवटच्या दिवशी आध्यात्मिक कॅलेंडर भेट देण्यात आले. वेशभूषा स्पर्धेमध्ये मुलांनी कृष्ण, राम, अर्जुन, विठ्ठल, राधा राणी अशा वेशभूषा केल्या. 

Comments

Popular posts from this blog

𝙒𝙚𝙖𝙩𝙝𝙚𝙧 𝙐𝙥𝙙𝙖𝙩𝙚| 23-24 जूनला मराठवाड्यातील या जिल्ह्यामध्ये होणार मुसळधार पावसाच्या आगमन

10 वी किंवा 12 बारावी झालेल्या विद्यार्थ्यांना आता पंधरा हजार रुपये मिळणार

1th मुलगी असेल तर आता पन्नास हजार रुपये मिळणार तात्काळ अर्ज करा